दैनंदिन आहारातील अनेक पदार्थांमध्ये साखरेचा समावेश असतो. साखर ही आरोग्यासाठी आवश्यक असली तरी त्याच्या अतिरिक्त सेवनाने डायबेटिज सारखा आजार होऊ शकतो.
तेव्हा महिनाभर साखरेचं सेवन न केल्यास आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत जाणून घेऊयात.
महिनाभर साखर खाणं सोडणार असाल तर तुम्ही त्याऐवजी नैसर्गिक साखर असलेले पदार्थ जसे फळं, भाज्या, तृणधान्ये इत्यादी खाऊ शकता. यामुळे शरीरावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
दैनंदिन आहारात साखरयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर आणि इन्सुलिनवर परिणाम होतो. परिणामी डायबेटिज आणि विविध आजारांचा धोका वाढतो.
महिनाभर साखरेचं सेवन न केल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
साखरेच्या सेवनाने वजन सुद्धा वाढतं. अशावेळी जर तुम्ही साखरेचं सेवन केलं नाही तर वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
एक महिना साखरयुक्त पदार्थांचं सेवन केलं नाही तर दातांचे आरोग्य चांगलं राहील. हिरड्यांचे आजार आणि कॅव्हेटीचा धोका टळेल.
साखरयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. तेव्हा साखरेचं सेवन टाळल्यास हा धोका कमी होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)