शारीरिक संबंधानंतर शरीरात कोणते हार्मोन्स बाहेर पडतात?

Neha Choudhary
May 26,2025


शारीरिक संबंधानंतर शरीरात अनेक महत्त्वाचे हार्मोन्स बाहेर पडतात असतात. ज्याचा सकारात्मक परिणाम मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.


ऑक्सिटोसिन हा हार्मोन्स प्रेम संप्रेरक म्हणून ओळखला जातो. हा हार्मोन्स मिठी आणि विश्वालाला प्रोत्साहन देतो. ज्यामुळे भागीदारांमधील भावनिक बंध मजबूत होतं.


डोपामाइन हे हार्मोन्स तुम्हाला आनंद, इच्छा आणि प्रेरणा देतो. या हार्मोन्सला फील गूड हार्मोन्स असंही म्हणतात. तसंच शारीरिक संबंधाच्या वेळी त्याचा मुबलकता आनंदाची भावना निर्माण करण्यास मदत करतो.


एंडोर्फिन हा नैसर्गिक वेदनाशामक आणि मूड उंचावण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यासोबत तणाव कमी करण्यास मदत करतो.


प्रोलॅक्टिन हा संप्रेरकामुळे समाधान आणि विश्रांतीची भावना निर्माण करतो. यामुळे पुरुषांना शारीरिक संबंधानंतर चांगली झोप येते.


सेरोटोनिन याला आनंदाचा हार्मोन्स असं म्हणतात. हे हार्मोन्स सेक्सनंतर संतुलित मूड आणि मानसिक शांती देतं.


नॉरपेनेफ्रिन हे तुम्हाला उत्तेजना, लक्ष आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. यामुळे शारीरिक संबंधाच्या वेळी संवेदना आणि आनंदात भर पडते.


अॅड्रेनालाईन हे हार्मोन्स फाइट ऑर फ्लाइट म्हणून पण ओळखला जातो. हे हार्मोन्स सेक्स दरम्यान ऊर्जा, हृदय गती आणि रक्तदाब वाढवतो.


(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story