पाकिस्तानचं सरकार नेहमी त्यांची अर्थव्यवस्था ही चांगली असल्याचा दावा करत पण त्याउलट पाकवर विदेशी कर्ज वाढतच चाललंय.
पाकिस्तानी मीडिया डॉननुसार देशात याचवर्षी चपाती आणि नानच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलाय. पण दुकानदार याला जुमानत नाहीयेत.
डॉनच्या एका रिपोर्टनुसार हा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानमध्ये १८० ग्रॅमच्या चपातीचे किंमत ही पाकिस्तानी रुपयांमध्ये १५ ते २० रुपये आहे.
भारतात एका चपातीची किंमत ही जवळपास ५ ते ६ रुपये आहे.
डॉनच्या एका रिपोर्टनुसार हा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानमध्ये १५ ग्रॅमच्या नानची किंमत ही पाकिस्तानी रुपयांमध्ये २५ ते ३० रुपये आहे.
तर भारतात नानची किंमत ही साधारणपणे ७ ते ९ रुपये आहे.
पाकिस्तानात महागाईचा भडला उडाल्यानं दुकानदार सरकारचं बोलणं ऐकत नाहीयेत.