Gua Sha म्हणजे काय, चेहऱ्यासाठी कसा ठरतो उपयुक्त, ही पद्धत माहिती करुन घ्या!

Intern
Jul 28,2025


'गुआ शा' हा एका प्रकारचा दगड आहे. हा दगड दिसायला खूपच साधा असतो पण त्याचे त्वचेवर अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.


'गुआ शा'च्या वापराने त्वचेच्या स्नायूंमधले रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.


याशिवाय, त्वचा नैसर्गिकरित्या तरुण आणि चमकदार बनते.


जर तुम्ही नियमितपणे 'गुआ शा' दगडाने मसाज केल्यास त्वचा घट्ट होण्यास मदत होते तसेच अँटी-एजिंगसाठी गुआ शा मसाज फायदेशीर ठरतो.


'गुआ शा'च्या वापराबद्दल बोलायचे झाले तर, सर्व प्रथम तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि थोडेसे फेस ऑइल किंवा सीरम लावा.


'गुआ शा' चेहऱ्यावर खालच्या बाजूने वरपर्यंत हलक्या हाताने फिरवा.


तुम्ही गुआ शा जबडा, गाल, कपाळ आणि डोळ्यांखाली वापरू शकता. पण हे लक्षात ठेवा की जास्त दाब देऊन मसाज करणे टाळावे.


आठवड्यातून किमान ३ वेळा 'गुआ शा' मसाज केल्याने त्वचेवर चांगले परिणाम दिसतील.

Disclaimer

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story