जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कॅन्सरने ग्रासलेलं असून ते या दुर्धर आजाराशी दोन हात करत आहेत.
तुम्ही त्वचेचा, आतड्याचा, स्तनांचा, फुफ्फुसांचा, रक्ताचा कॅन्सर याबद्दल ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितीये का ओठांनाही कॅन्सरचा धोका असतो.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे की ओठांना पण कॅन्सरचा धोका असतो. ओठांना कॅन्सर झाल्यास त्याला लिप कॅन्सर असं म्हणतात.
लिप कॅन्सर हा ओठांवरील त्वचा आणि आतल्या मुलायम त्वचेच्या भागावर परिणाम करु शकतो.
लिप कॅन्सर का होतो? याची अनेक कारण असू शकतात. तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना याचा धोका अधिक असतो.
सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांना लिप कॅन्सर होऊ शकतो. अति मद्यपान करणाऱ्यांनाही लिप कॅन्सरचा धोका असतो.
सूर्याची घातक किरणं म्हणजेच युव्ही रेजमुळेही ओठांचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजेच अधिक काळ उन्हात राहणाऱ्यांनाही याचा धोका असतो.
ओठांच्या कॅन्सरचीही काही लक्षणं आहेत. उदाहरणार्थ ओठाला एखादी जखम झाली तर ती दिर्घकाळ बरी होतं नाही.
ओठांच्या त्वचेवर गाठ आल्याप्रमाणे वाटणे किंवा ओठ सुजणे हे सुद्धा ओठांच्या कॅन्सरचं लक्षण आहे. तसेच जेवताना, बोलताना, ओठ हलवताना दुखणे ही सुद्धा कॅन्सरची लक्षणं मानली जातात.
याच कारणामुळे आरोग्यासंदर्भात डॉक्टरांचा वारंवार सल्ला घेणं फायद्याचं असतं. घरच्या घरी इलाज करण्याऐवजी वेळीच डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.) (सर्व फोटो - पीनट्रेस आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरुन साभार)