अनेक जण आता आपल्या फिटनेसबाबत जागरूक झाले आहेत. हेल्दी डाएट आणि व्यायामाची सुरुवात करत आहेत
अनेकजण मॉर्निंग वॉकमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यायाम ट्राय करताना दिसताहेत
पिरॅमिड वॉक अलीकडे ट्रेंडमध्ये दिसतोय. काय आहे हा प्रकार, जाणून घेऊयात.
पिरॅमिड वॉकच्या मदतीने तुम्ही निरोगी शरीर मिळवू शकता. या व्यायाम प्रकारात सुरुवातील हळूहळू चालायचे आहे
त्यानंतर चालण्याचा वेग वाढवायचा आहे. या वॉकमध्ये तुम्ही एका विशिष्ट वेग पकडल्यानंतर पुन्हा हळू चालायचं आहे.
हा वॉक साधारण 25 मिनिटे करायचा आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने वेग कमी जास्त करु शकता
यामुळं वजन झपाट्याने कमी होते तसंच हॉर्ट हेल्थदेखील चांगली राहते. यामुळं शरीराचा स्टॅमिनादेखील वाढतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)