रॅटला मराठीमध्ये उंदीर म्हणतात तसचं माऊसला सुध्दा मराठीमध्ये उंदीरच म्हणतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक कोणता असतो ? जाणून घेऊया.
रॅट हा आकाराने माऊसपेक्षा दुप्पट असतो. तर माऊस हा आकाराने खूपच छोटा आणि बारीक असतो.
माऊस हा त्याच्या आकारासोबतच वजनामध्ये सुध्दा खूप हलका असतो, तर रॅट हा अर्धा किलो पर्यंत असू शकतो.
रॅटची शेपूट ही जाड असते आणि त्याच्या शेपटीला केस कमी असतात, तर याउलट माऊसची शेपूट लांब, बारीक आणि केसांनी भरलेली असते.
रॅटचे नाक रुंद आणि मोठे असते, तर माऊसचे नाक हे आकाराने छोटे आणि टोकदार असते.
रॅट हा खूप चपळ आणि आक्रमक असतो, तर माऊस हा लाजरा आणि लगेच घाबरणारा असतो.
रॅटचे कान छोटे आणि जाड असतात, तर याउलट माऊसचे कान हे मोठे आणि बारीक असतात.
रॅटचे आयुष्य हे 2 ते 3 वर्षांचे असते, तर माऊस हा केवळ 1 वर्ष जगू शकतो.
वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.