आपण अगदी रोज वॉशरूम, बाथरूम आणि टॉयलेट हे शब्द खूप वापरतो आणि ऐकतो.
हे तिन्ही शब्द एकाच जागेसाठी वापरले जातात. पण तुम्हाला त्यांच्यातील फरक माहित आहे का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोज वापरल्या जाणाऱ्या या शब्दांमधील फरक आपल्या अनेकांना माहित नाही.
चला जाणून घेऊयात कोणत्या जागेला बाथरूम म्हणतात, कोणत्या जागेला वॉशरूम म्हणतात आणि कोणत्या जागेला टॉयलेट म्हणतात.
बाथरूम हा शब्द सामान्यतः अशा घरातील जागेसाठी वापरला जातो जिथे आंघोळीची सुविधा तसेच टॉयलेटची जागा असते.
वॉशरूम म्हणजे अशी खोली ज्यामध्ये सिंक आणि टॉयलेट सीट दोन्ही असतात. हे सामान्यतः सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते.
टॉयलेट म्हणजे अशी जागा जिथे फक्त टॉयलेट अर्थात शौचालयाची जागा असते आणि हात धुण्याची सुविधा नसते.