दही आणि योगर्ट दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, या दोन्ही पदार्थांमध्ये खूप फरक आहे.
दही बनवण्यासाठी आधी दूध गरम करुन मग कोमट झाल्यानंतर त्यात थोडेसे दही टाकून त्याचे विरजण लावले जाते
मात्र, योगर्टसाठी दूध गरम करुन त्यात खास पद्धतीवे बॅक्टेरिया कल्चर मिसळले जाते. Lactobacillus Bulgarisand Streptococcus Thermophilus या बॅक्टेरियाचा जिवंत स्ट्रेन असतो.
दह्याची चव ही थोडी आंबट असते आणि दही जाड असते. मात्र योगर्ट थोडे गोडसर आणि क्रिमी असते
दह्यात प्रोबायोटिक्सची मात्रा जास्त असते. प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया असतात जे पचनक्रिया तंदुरुस्त राखण्यास मदत होते.अशावेळी पचनासाठी दही जास्त चांगलं असते
योगर्टमध्ये प्रोटीनची मात्रा दह्यापेक्षा जास्त असते. त्याचबरोबर जर तुम्ही वेट लॉस डाएट फॉलो करत असाल तर योगर्ट आहारात समाविष्ट करा.
दही आणि योगर्ट हे दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण जर तुम्ही लेक्टोज इंटोलरेंट आहात तर योगर्ट तुमच्यासाठी फायदेशीर आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)