मोमोज आणि डिमसममध्ये नक्की फरक काय? पाहूयात 'या' पदार्थांमधील अंतर

Intern
Mar 29,2025


मोमोज आणि डिमसम हे दोन्ही पदार्थ लोकप्रिय आहेत. मात्र, अनेकांना यातील फरक माहित नसतो.


हॉटेलमध्ये हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे लिहिलेले दिसतात. हे दोन्ही पदार्थ चवीला आणि दिसायलाही वेगळे असतात.


पाहुयात, मोमोज आणि डिमसममध्ये कोणकोणते फरक आहे.

मोमोज

मोमोज हे भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. हे आकाराने छोटे असतात आणि वाफवून तयार केले जातात.


मोमोज मुख्य नेपाळ आणि तिबेटच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहेत आणि भारतात ते खूप लोकप्रिय आहेत.


भारतात मोमोजचे अनेक प्रकारही असतात. जसे की, फ्राईड मोमोज, ग्रेवी मोमोज.

डिमसम

डिमसम ही एक चायनीज डिश आहे. डिमसमदेखील वाफवून तयार केले जातात.


डिमसममध्ये राईस पेपर वापरला जातो. त्यामुळे त्यातील सारण स्पष्टपणे दिसू लागते.


डिमसम सहसा चहा किंवा इतर ड्रिंक्ससोबत खाल्ले जातात.

VIEW ALL

Read Next Story