लग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 02,2023

केळवण म्हणजे काय?

केळवण म्हणजे वधू-वरांच्या घरचे तसेच त्याचे नातेवाईक, मित्र जेवणासाठी आमंत्रण देतात व भेटवस्तू देऊन त्याचा पाहुणचार करतात. याच सोहळ्याला केळवण असे म्हणतात.

जेवणाचे आमंत्रण

केळवणात आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून वधू आणि वराला जेवणाचे खास आमंत्रण दिले जाते.

आवडीच्या पदार्थांना प्राधान्य

वधु-वराच्या आवडीच्या पदार्थांना या जेवणात प्राधान्य असतं. लग्नाअगोदर वधु-वराचे लाड करावेत या उद्देशाने हा सोहळा पार पडतो.

आवडती भेट वस्तू

वधु-वरांना या केळवणात आवडीची भेट वस्तू देखील दिली जाते. वधुला माहेरच्या मंडळींकडून मिळणाऱ्या या भेटवस्तूंच खास कौतुक असतं.

खास क्षण

हल्ली वधु-वराचे केळवण एकत्रच साजरे केले जाते. अशावेळी नव दाम्पत्यासाठी हा अतिशय खास क्षण असतो.

लग्नसराई

लग्नसराईत सुरु झाली आहे, सगळीकडे सध्या केळवणाचा ट्रेंड पाहायला मिळतो.

VIEW ALL

Read Next Story