अनेकदा जेव्हा आपण टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन सारख्या वस्तू ऑर्डर करतो तेव्हा या वस्तू तपकिरी रंगाच्या बॉक्समध्ये येतात.
या तपकिरी रंगाच्या कार्डबोर्ड बॉक्स किंवा कार्टून बॉक्सवर अनेक प्रकारची चिन्ह असतात. याचे वेगवेगळे अर्थ असतात.
या वेगेवेगळ्या चिन्हांमध्ये एक असते ती छत्री. या छत्रीचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नाही? चला मग छत्री चिन्हाचा अर्थ काय ते जाणून घेऊयात...
बॉक्सवरील छत्रीचे चिन्ह आपल्याला सांगते की हा बॉक्स कोरड्या जागी ठेवावा आणि तो ओला होण्यापासून संरक्षित ठेवावा, ओला होऊ देऊ नये.
याचा अर्थ असा होतो की बॉक्समध्ये पॅक केलेल्या वस्तू पाण्याच्या संपर्कात येऊ नयेत आणि त्या ओल्या होण्यापासून वाचवाव्यात.
हे चिन्ह सर्वांना सावध करण्यासाठी आहे, मग ते तुम्ही असो किंवा मग डिलिव्हरी बॉय असो.