उन्हाळा आला की, घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा दर दिवशीसुद्धा प्रखर सूर्यकिरणांमध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर केला जातो.
लहान मुलांना सनस्क्रीन लावावं की लावू नये? हा प्रश्न मात्र अनेक पालकांच्या मनात सातत्यानं घर करत असतो.
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते बाळाचं वय 1 वर्षाहून अधिक असल्यास त्यांना सनस्क्रीन लावता येतं.
उन्हात गेलं नाही तरीही अतिनील किरणांचा प्रभाव घरातही जाणवू शकतो.
मोबाईलचा वापर, टेलिव्हिजनसमोर असणं या माध्यमातून अनेक किरणं मुलांच्या संपर्कात येतात त्यामुळं सनस्क्रीन घरातही वापरावं.
घरातून बाहेर पडण्याआधी अर्ध्या तासापूर्वी सनस्क्रीन लावावं, यामुळं त्वचेचं काळवंडणं थांबवता येतं.
लहान मुलांसाठी वेगळे सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळं प्रौढांचे प्रोडक्ट त्यांच्यासाठी कधीही वापरू नयेत. (वरील माहितीच्या आधारे कोणत्याही निर्णय घेण्याआधी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)