रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती?


झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते. परंतु सध्या कामाचा ताण, स्मार्ट फोनचा वाढता वापर इत्यादींमुळे अनेकांचं झोपेचं गणित बिघडलं आहे.


तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात 7 ते 8 तासाची झोप घ्यायला हवी.


परंतु रात्री किती वाजता झोपायला हवे याबाबत अनेक जणांमध्ये संभ्रम असतो.


क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, 2022 मध्ये यासंबंधीचे एक संशोधन करण्यात आले होते, ज्यामध्ये असे आढळून आले की लोकांनी रात्री 10 वाजेपर्यंत झोपायला हवे.


UK मध्ये हा अभ्यास करण्यात आला होता ज्यामध्ये 88000 प्रौढांचा समावेश होता.


तसेच इतर काही अभ्यासानुसार रात्री 10 ते 11 दरम्यान झोपणे फायदेशीर ठरते.


रिपोर्टनुसार, निरोगी राहण्यासाठी रात्री 10-11 वाजेपर्यंत झोपणे चांगले मानले जाते. मात्र वैयक्तिक आरोग्यानुसार झोपेची वेळ आणि गरज वेगळी असू शकते.


चांगली झोप झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं आणि स्ट्रोक येण्याचा धोका टाळतो.


पुरेशी झोप झाल्याने मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले राहते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story