नॉन व्हेज खाल्ल्यानंतर लगेच फळं खायला नको. फळं खाल्ल्यानं त्याचा परिणाम हा पचन क्रियेवर होतो. त्याचा परिणाम अनेकांना लगेच दिसू शकतो तर काही लोकांना उशिरानं दिसू शकतो.
नॉन व्हेज खाल्ल्यानंतर दही खायला नको. नॉन व्हेज खाल्ल्यानं शरीरातील गरमी वाढते तर दही थंड असतं. नॉन व्हेज लगेच दही खाल्ल्यावर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
नॉन व्हेज खाल्ल्यानंतर लगेच चहा देखील पिऊ नये. जर तुम्ही हे करत असाल तर त्याचा फार वाईट परिणाम होऊ शकतो. पोटात आग होणं, दुखणं आणि अपचणसारखी समस्या होण्याची शक्यता आहे.
नॉन व्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही दूध प्यायला नको याशिवाय दूधापासून बनवण्यात आलेले कोणतेही पदार्थही खायला नको.
दूध किंवा त्यापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांचं आणि नॉन व्हेजचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी खतरनाक ठरू शकतं. कारण या गोष्टी एकत्र झाल्यास त्या आपल्या आरोग्यासाठी विष ठरु शकतात.
या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नॉन व्हेज खाल्ल्यानंतर लगेच खाल्ल्या तर ब्लॉकेज होण्याची शक्यता असते.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)