उन्हाळ्यात वर्षभराचे मसाले साठवताना कोणती काळजी घ्यावी?

Pooja Pawar
May 12,2025


भारतीय मसाल्यांशिवाय जेवण हे फिकचं असतं. तेव्हा उन्हाळ्यात अनेकजण वर्षभर पुरतील असे मसाले तयार करून साठवायचा प्रयत्न करतात. तेव्हा मसाले साठवून ठेवताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊयात.


मसाले उदा. मिरच्या, गरम मसाले, इत्यादी उन्हात नीट सुकवून घ्या आणि मग दळायला द्या.


मसाले जर वर्षभर टिकवायचे असतील त्यांना हवाबंद डब्यात ठेवावं. अधिकतर मसाले काचेच्या किंवा लोखंडी डब्यात ठेवावेत.


मसाल्यांची चव आणि सुगंध टिकवून ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळेच जेवणाची चव वाढते. मसाल्यांचे उन्हापासून रक्षण करायला हवे कारण त्यामुळे त्याची चव आणि सुगंध कमी होऊ शकतो. त्यामुळे दळून झालेले मसाले थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाहीत अशा जागी ठेवावेत.


बऱ्याच जणांच्या घरात मसाले हे अगदी गॅस जवळ ठेवले जातात. पण यामुळे मसाल्यांची चव टिकून राहत नाही. अति उष्णतेमुळे मसाले खराब होऊ शकतात. त्यामुळे मसाले ठेवण्यासाठी योग्य ती जागा निवडा.


पावसाळ्यात बऱ्याच घरातील काही भागांना ओलावा येतो अशावेळी मसाले अशा ठिकाणी साठवायला हवे ज्या ठिकाणी ओलावा नसेल. तसेच मसाला वापरताना त्यात कोरडा चमचा घाला.


मसाला साठवताना त्यात हिंगाचे खडे ठेवा, यामुळे मसाल्याला कीड लागत नाही.

VIEW ALL

Read Next Story