Cancer पसरल्यावर शरीरात काय लक्षणं दिसतात?

Neha Choudhary
May 01,2025


जेव्हा शरीराच्या एका भागात असलेली गाठ रक्त किंवा लसीका प्रणालीद्वारे शरीराच्या इतर भागात पेशी पाठवतात तेव्हा कर्करोग पसरतो. त्यामुळे इतर ठिकाणीही गाठी दिसतात.


लऊनऊ केअर इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसच्या एमडी फिजिशियन डॉ. सीमा यादव यांनी याबद्दल माहिती दिली आहे.


कर्करोग जेव्हा शरीराच्या एका भागात असतो तेव्हा त्याला प्राथमिक कर्करोग असं म्हणतात. पण जेव्हा इतर अवयवांमध्ये तो पसरतो, तेव्हा तो दुय्यम किंवा मेटास्टॅटिक कर्करोग असतो.


कर्करोगाचा प्रसार होण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे रक्तप्रवाहातून ज्याला हेमेटोजेनस स्प्रेड असं म्हणतात. यामुळे कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागात पोहोचू शकतात.


लसीका प्रणाली देखील कर्करोग पसरवण्याचा एक मार्ग असणार आहे. जिथे कर्करोगाच्या पेशी लिम्फ नोड्समध्ये जाऊ शकतात. शिवाय संपूर्ण शरीरात पसरू शकता आणि इतर अवयवांवर परिणाम करतात.


कर्करोग स्पर्शाने पसरतो, असं अनेकांना वाटतं. पण हा एक मोठा गैरसमज आहे. कर्करोग स्पर्शाने, खाण्याने किंवा श्वासोच्छवासाने पसरत नाही.


जेव्हा शरीरातील सामान्य पेशी काही कारणास्तव अनियमितपणे वाढतात आणि एकाच ठिकाणी गोळा होऊन ट्यूमर तयार होतो तेव्हा कर्करोग सुरू होतो.


तंबाखू, विषाणू, प्रदूषण किंवा अनुवांशिक घटक यांसारखे कार्सिनोजेन्स कर्करोगाच्या पेशींच्या अनियमित वाढीस जबाबदार असतात. ज्यामुळे डीएनए खराब होते आणि पेशी कर्करोगग्रस्त होतात.


कर्करोगाचे चार मुख्य टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यात हा आजार अधिक गंभीर होत जातो. पहिल्या टप्प्यात उपचार करणे सोपे आहे. तर चौथ्या टप्प्यात ते संपूरण शरीरात पसरले जाते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story