पाळीव मांजर चावल्यानंतर काय करावं? मांजर मालकाला का चावते?

Intern
Mar 05,2025

मांजर पाळणे

अनेक लोकांना घरात मांजरी पाळायला खूप आवडतात आणि ते मांजरीला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागवतात.

सर्व गोष्टींची व्यवस्था

लोक आपल्या पाळीव मांजरीसाठी त्यांच्या जेवणापासून ते राहण्यासाठी आणि खेळण्यासाठी उत्तम व्यवस्था करतात.

मालकालाचं चावणे

अशा उत्तम देखरेखीमध्ये देखील अनेक वेळा पाळीव मांजर आपल्या मालकाला चावते. याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊयात.

अनेक कारणं

प्राणी तज्ज्ञांच्या मते, मांजर आपल्या मालकाला उगाचच चावत नाही. त्यामागे काही कारणे असू शकतात.


तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मांजर आपल्या मालकाचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधू इच्छिते, तेव्हा ती चावू शकते.

भीती किंवा चिंता

कधी कधी, मांजराला भीती, चिंता किंवा असुरक्षितता वाटत असेल, तेव्हा ती चावू शकते.

राग

जर मांजर रागावलेली असेल किंवा खूप उत्साहित असेल, तेव्हाही ती चावू शकते.

मांजर चावल्यास काय करावे?

जर माणसाला मांजर चावली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे जखम आणि बॅक्टेरिया पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.


मांजर चावल्यास जखम त्वरीत साबण आणि पाण्याने कमीत कमी 5 मिनिटे धुवावे आणि जखमेतून रक्त येत असेल तिथे दाबून ठेवावी.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story