पावसाळ्यात अनेकदा खाद्यपदार्थांना ओलावा लागल्याने पदार्थ खराब होतात. जर तुम्ही लोणचं व्यवस्थित साठवलं नाही तर तुमच्या लोणच्याला ओलाव्यामुळे बुरशी देखील येऊ शकते.
लोणचं पावसाळ्याच्या दिवसात खराब होण्यापासून वाचवण्यासाठी काही टिप्स फॉलो करायला हव्यात. तेव्हा आंबा, फणस, मिरची इत्यादी लोणची साठवण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
लोणच्याला जर बुरशी लागली असेल तर सुक्या चमच्याने ती बुरशी बाहेर काढा. आता लोणच्याच्या गरजेनुसार एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा.
तेल नीट गरम झालं की थोडावेळ थंड होऊ द्या आणि मग लोणच्याच्या बरणीत तेल टाकून त्यावर झाकण लावून ठेऊन द्या.
लोणच्यात अशा प्रकारे मोहरीचे तेल टाकल्यावर हे तेल प्रिजरवेटिव प्रमाणे काम करते. त्यामुळे लोणचं अनेक वर्ष खराब होत नाही. पावसाळ्यात तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता.
लोणचे खराब होऊ नये म्हणून, तुम्ही लोणचं उन्हात देखील ठेवू शकता जेणेकरून लोणच्याच्या डब्यात ओलावा निर्माण होण्यार नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)