सकाळी उपाशीपोटी नेमकं काय खावं? जाणून घ्या

भूक

रात्रभर उपाशी असल्यामुळं पोटात भुकेने अक्षरश: कावळे ओरडत असतात. ज्यामुळं समोर येईल त्या गोष्टीवर बऱ्याचदा ताव मारला जातो.

चहा

एक लक्षात घ्या, सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिऊ नये. याऐवजी गरम किंवा कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.

सुकामेवा

उपाशीपोटी सकाळच्या वेळी सुकामेवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. याशिवाय एखादं फळ, पपईचं सेवनही करणं उत्तम ठरू शकतं.

दालचिनी

उपाशीपोटी दालचिनीचं सेवनही फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञ म्हणतात. उपाशीपोटी एखादं उकडलेलं अंड खाणंही फायद्याचं.

दूध

पोट रिकामं असताना सकाळी थंड किंवा कोमट दूध पिणंही शरीरासाठी फायद्याचं.

लिंबाचा रस

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून याचं सेवन उपाशीपोटी केल्यास त्यामुळं बराच फायदा होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story