वजन कमी करण्यासाठी, ओट्स सारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा, ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते जे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. तसेच ओट्समुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर देखील नियंत्रित राहते.
आपल्या शरीराला योग्य पोषण मिळण्यासाठी अंड हा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि अंड्यामुळे भूकसुद्धा कमी लागते . वजन कमी करणाऱ्यांसाठी उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा स्क्रॅम्बल्ड अंडे हा एक चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये कमी कॅलरीज असतात.
पालक, काकडी, धणे, आलं आणि लिंबूपासून बनवलेल्या हिरव्या स्मूदीचे सेवन करा. ज्यामध्ये फायबर, एंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात, त्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय राहते. वजन कमी करण्यासाठी या स्मूदीचे सेवन करणे खूप उपयुक्त आहे.
दही आणि ताजी फळे यांचे मिश्रण खाल्याने ते पचनासाठी खूप फायदेशीर ठरते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतडे निरोगी ठेवतात, तर फळे शरीराला फायबर आणि गोडवा देतात. दही आणि ताज्या फळांचे मिश्रण भूक शांत करते आणि मेटाबॉलिज्म वाढवते.
मूग, चणे किंवा इतर कोंब आलेल्या धान्यांमध्ये भरपूर प्रोटीन फायबर आणि महत्वाची पोषक तत्वे असतात. ज्यामुळे संपूर्ण दिवस शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. तुम्ही लिंबू आणि मीठ घालून याचे सेवन करू शकता.
जर तुम्हाला ब्रेड खायला आवडत असेल तर पांढरे ब्रेड खाणे टाळा आणि गव्हाच्या ब्रेडवर पीनट बटर लावून खा. त्यामुळे शरीराला भरपूर प्रोटीन मिळते आणि बराच वेळ पोट भरलेले राहते.
लिंबू पाणी हा नाश्ता नाही, पण कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते आणि यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.
बदाम, अक्रोड, चिया सिडस्, जवस यांसारखा सुकामेवा आणि बिया वजन कमी करण्यास मदत करतात, त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले निरोगी पोषकतत्वे असतात, तर सकाळी नाश्त्यात यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.