मूग, मुगाची डाळ किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ पचण्यास अतिशय हलके असून, त्यात बरीच पोषक तत्त्वंही असतात.
प्रथिनं, तंतुमय घटक आणि जीवनसत्त्वांचा भरणा मूगात असतो.
साधारण महिनाभर मुगाची किंवा मुगडाळीची खिचडी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
महिनाभर मूगडाळीची खिचडी खाण्यानं पचनक्रिया सुधारते, वजनही आटोक्यात राहतं आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मूगडाळीमध्ये असणारे घटक आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्तीला आणखी सक्षम बनवतात. मूगडाळीच्या खिचडीमुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो.
मात्र सतत खिचडी खाल्ल्यास शरीराला इतर पोषक तत्त्वांचा पुरवठा होत नाही, ही बाब दुर्लक्षित ठेवून चालणार नाही.
मूगडाळीमध्ये ऑक्सलेट असून यामुळं मूतखडा असणाऱ्यांनी खिचडी आणि तत्सम पदार्थ टाळावेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)