तेलकट भांडी घासून घासून किचनमधील बेसिंगला एक चिकटपणा आणि काळपटपणा आलेला असतो. अशावेळी नेमकं काय करायचं कळत नाही. तसेच ऍल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी अनेकदा महिला काळा साबण वापरतात.
पण या साबणाने अनेकदा महिलांचे हात चिकट होतात. अशावेळी घरातील गव्हाचं पीठ आणि केस धुण्यासाठी आणलेला 1 रुपयाचा शॅम्पू करेल अतिशय कमाल.
सुरुवातीला 2 चमचे गव्हाचं पीठ एका वाटीत घ्या. त्या वाटीत 1 रुपयाच्या शॅम्पूचे 4 ते 5 थेंब टाका.
यानंतर तुमच्या घरातील ऍल्युमिनियमचे मोठे डब्बे किंवा टोप स्वच्छ करण्यासाठी या मिश्रणाचा वापर देखील करा.
गव्हाचं पीठ आणि शॅम्पू एकत्र केल्यावरही ते अतिशय कोरडं वाटतं. अशावेळी त्यामध्ये थोडं पाणी घाला.
त्या मिश्रणात पाणी घातल्यामुळे ते पातळ होईल. मग हे मिश्रण स्क्रॉच किंवा भांडी घासण्याच्या काथ्याने भांडी घासा.
या मिश्रणाने भांडी घासल्याने ऍल्युमिनियमची भांडी अतिशय काचेसारखी चमकू लागतील.
तसेच खूप भांडी घासून अनेकदा बेसिंग तेलकट आणि चिकट होते. अशावेळी काळपट झालेल्या बेसिंगला घासण्यासाठी या मिश्रणाचा वापर करा.