चपातीविषयीच सांगावं, तर भारतातील अनेक कुटुंबांकडून आहारामध्ये चपातीचा समावेश केला जातो. मुळात चपाती ही कायमच ताजी बनवून खाणं अपेक्षित असतं.
अनेकदा काही कुटुंबांमध्ये मात्र चपात्या एकाच वेळी जास्त प्रमाणात बनवून त्यानंतर त्या गरजेनुसार खाण्याला प्राधान्य दिलं जातं.
अन्नपदार्थ वाया जाऊ नये आणि तातडीनं ते खाताही यावेत हे त्यामागचे हेतू असतात. चपातीच्या बाबतीतही असंच घडतं.
अनेकदा चपाती बनवल्यानंतर ती फ्रिजमध्ये ठेवली जाते, गरजेनुसार गरम करून खाल्ली जाते. पण, ती योग्य पद्धतीनं फ्रिजमध्ये ठेवली तरच व्यवस्थित टीकू शकते.
अनेकदा दीर्घकाळापासून बनवून ठेवलेली चपाती खाल्ल्यानं पोटदुखीही उदभवते. जाणकार आणि आहारजत्ज्ञांच्या मते सकाळी बनवलेली चपाती 12 ते 14 तासांमध्ये खाणं अपेक्षित असतं.
चपाती बनवून 14 तासांनंतर खाल्ल्यास बऱ्याचदा ती शिळी होऊन ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळं पोटाच्या विकाराचा धोका उदभवतो.