गोड पदार्थांमध्ये जिलेबी ही अनेकांची अतिशय फेव्हरेट असते. विशेषतः उत्तर भारतात जिलेबी खूप प्रमाणात खाल्ली जाते.
जिलेबी ही भारतातील एक लोकप्रिय मिठाई असली तरी हा भारतीय पदार्थ नाही.
जलेबी हे नाव अरबी शब्द 'जलेबिया' पासून आले आहे. जिलेबी प्रथम इराणमध्ये बनवले गेली, तेथे लोक खूप आवडीने जिलेबी खायचे.
जिलेबी पर्शियन आणि तुर्की व्यापाऱ्यांनी भारतात आणली होती असं म्हंटल जातं. त्याच्या चवीमुळे आणि वळलेल्या आकारामुळे, ती हळूहळू भारतात खूप लोकप्रिय झाली.
जिलेबी ही आता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली असून दूध, दही आणि रबडीसोबत लोकांना खायला आवडते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)