पोटात गॅस झाल्यामुळे फक्त पोटातच नाही तर शरीराच्या इतर भागांमध्येही वेदना होतात.
पोटाशिवाय कोणता भागत दुखतो त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
गॅस झाल्यावर सगळ्यात प्रथम नाभीभोवती वेदना आणि पेटके येतात.
पोटाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला म्हणजेच मोठ्या आतड्यात वायू अडकतो, ज्यामुळे पोटाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला वेदना होतात.
पोटानंतर छातीत गॅसचा त्रास होतो, तेव्हा छातीत जळजळ आणि खाज सुटते.
गॅस झाल्यास पाठीच्या खालच्या भागात किंवा पाठीच्या मध्यभागीदेखील वेदना होतात.
अनेकांना खांदे आणि मानेमध्येही गॅसचा त्रास होतो.
मायग्रेन असलेल्या लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)