धर्म शास्त्रांमध्ये रुद्राक्ष घालण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. पण रुद्राक्ष घातल्यावर व्यक्तीला बऱ्याच नियमांचं पालन करावं लागतं.
धार्मिक मान्यतेनुसार रुद्राक्ष घालून काही ठिकाणांवर जाण वर्जित मानलं जातं. तेव्हा अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे तुम्ही गळ्यात रुद्राक्ष घालून जाऊ नयेत याविषयी जाणून घेऊयात.
रुद्राक्षाला खूप पवित्र मानलं जातं. तेव्हा रुद्राक्ष घालून स्मशानभूमीत जाऊ नये.
रुद्राक्ष घातलेल्या व्यक्तीने जिथे मांसाहार आणि दारूचे सेवन होत असेल अशा ठिकाणी जाऊ नये. यामुळे तुमचं रुद्राक्ष अशुद्ध होतं असं म्हणतात.
ज्योतिषांच्या सांगण्यानुसार जिथे नवजात बालकाचा जन्म झाला असेल तिथे रुद्राक्ष घातलेल्या व्यक्तीने जाऊ नये. कारण तेव्हा सुतक काळ चालू असतो.
झोपताना नेहमी रुद्राक्ष काढून झोपावं असं तज्ज्ञ ज्योतिषी सांगतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)