बऱ्याचदा घराच्या छतावर, खिडकीवर, बाल्कनीमध्ये विविध प्रकारचे पक्षी विसावण्यासाठी येतात.
वास्तूशास्त्रानुसार, घरात काही पशु-पक्ष्यांचं आगमन शुभ मानलं जातं. तेव्हा असे पक्षी कोणते ज्यांचं येणं हे घरासाठी शुभ असतं याविषयी जाणून घेऊयात.
घराच्या खिडकीत पोपट हा पक्षी येणं सुद्धा शुभ मानलं जातं. तुमच्या व्यवसायात प्रगती होणार आहे असा हा शुभ संकेत असतो, ज्यामुळे तुम्हाला चांगलं फळ सुद्धा प्राप्त होतं.
कबुतर हा पक्षी घरात येन हे शुभ मानलं जात नाही, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येतात आणि वातावरण सुद्धा नकारात्मक होतं असं म्हटलं जातं.
जर तुमच्या घरात किंवा अंगणात मोर येत असेल तर तुमचा पुढील काळ हा चांगला असेल याचे हे संकेत असतात.
घरात वटवाघूळ आल्याने नकारात्मक ऊर्जा येते असं म्हटलं जातं. यामुळे घरात धन-संपत्तीची आवक वाढत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)