जगभरात एकूण 195 देश असून यातील काही देश हे क्षेत्रफळाने तर काही देश हे लोकसंख्येने मोठे आहेत.
तुम्हाला माहितीये का, जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येने सर्वात लहान देश कोणता आहे? जिथे फक्त 27 लोकं राहतात.
सिलॅन्ड : क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात छोटा देश हा सिलॅन्ड आहे.
सिलॅन्ड हे एक मायक्रोनेशन असून ते उत्तर समुद्रात आहे आणि इंग्लंडच्याजवळ आहे.
सिलॅन्डला 1967 मध्ये एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आले होते. पण त्याला जगातील कोणत्याही देशाकडून मान्यता मिळाली नाही.
सिलॅन्ड समुद्राच्या मधोमध असून ज्याचं क्षेत्रफळ हे 250 मीटर आहे.
सिलॅन्डला रफ फोर्ट म्हणून सुद्धा ओळखले जाते. सिलॅन्ड हा समुद्राच्या मधोमध समुद्री किल्ल्यावर वसला आहे. ज्याला दुसऱ्या विश्व युद्धादरम्यान बनवण्यात आलं होतं.