जेवण्याच्या 'या' पद्धती नकळत वाढवतायत तुमचं वजन

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

कळत नकळत

कळत नकळत जेवण्याच्या अनेक सवयी वजन वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत या वस्तूस्थिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

खाण्याच्या नादात...

अनेकदा पटापट खाण्याच्या नादात मेंदूपर्यंत पोट भरण्याचे संकेत अतिशय धीम्या गतीनं पोहोचतात. ज्यामुळं अवाजवी खाणं वाढतं.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

टीव्ही आणि मोबाईल

टीव्ही आणि मोबाईल पाहत जेवताना अनेकदा आपण किती खातोय याचा अंदाजच येत नाही आणि जास्त खाणं खाल्लं जातं. तर काही प्रसंगी भूक नसतानाही खाल्लं जातं आणि वजन वाढतं.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

गोडाचे पदार्थ

अति प्रमाणात गोडाचे पदार्थ खाणं, शीतपेय पिणं यामुळं शरीरातील कॅलरी वाढतात आणि परिणामी वजनावर याचा परिणाम होतो.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

मेटाबॉलिझम

रात्री उशिरा खाल्ल्यानं मेटाबॉलिझम अधिक वेळ घेतं आणि त्यामुळं शरीरात चरबी साठून राहते.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

शीतपेय

शीतपेय किंवा ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळं नकळत वजन वाढतं.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

वेळेवर न खाणं

वेळेवर न खाणं, अनियमित पदार्थांचं सेवन, असंतुलित आहार आणि सतत बाहेरचं खाणं अशा कारणांमुळं वजन वाढतं.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.

Published by: Sayali Patil | Aug 04, 2025

VIEW ALL

Read Next Story