मॉर्निंग वॉक करण्याची योग्यवेळ माहितीये का?

Pooja Pawar
May 23,2025


मॉर्निंग वॉक हा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. यामुळे शरीराला अनेक फायदे सुद्धा मिळतात.


परंतु तुम्ही सकाळी कोणत्या वेळेत मॉर्निंग वॉक करता हे सुद्धा महत्वाचं असतं.


सकाळच्या वेळी हवा थंड असते, ज्यामुळे लोकांना मॉर्निंग वॉकी करण्यासाठी सोपं जातं, तसेच सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा असतं.


फ्रेश हवेसाठी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी निघणं सर्वात चांगलं मानलं जातं. यावेळी तापमान सुद्धा थंड असतं.


तसेच तुम्ही जर सकाळी 6: 30 ते 8 च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला गेलात तर तुम्हाला सूर्यकिरणांद्वारे व्हिटॅमिन डी सुद्धा मिळेल.


सकाळी 8 ते 10 दरम्यान नाश्ता केल्यावर सुद्धा तुम्ही चालायला जाऊ शकता. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.


डायबेटिजच्या रुग्णांसाठी मॉर्निंग वॉक अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत मिळते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story