फळांच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक फळ हे वेगवेगळ्या पोषकतत्वांनी भरपूर असतं.
फळं जर योग्यवेळी खाल्ली गेली तर त्यातील पोषकतत्व चांगल्या प्रकारे शरीराला प्राप्त होतात.
अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते नाश्त्यात सकाळी 12 वाजायच्या आधी फळांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
यावेळी आपली पचनक्रिया ही थोडी मंद असते. त्यामुळे अशावेळी फळांचे सेवन केल्यास त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स शरीराला योग्य प्रकारे मिळतात.
जर सकाळी फळं खाणं शक्य नसेल तर संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान फळांचे सेवन करावे.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार नेहमी ताजी फळं खायला हवीत. अनेकजण सकाळी कापलेली फळं संध्याकाळी खातात मात्र त्यातून शरीराला योग्य पोषकतत्व मिळत नाहीत.
फळं कापल्यावर लगेचच खायला हवीत.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)