भारतात चहाचे उत्पादन आणि सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते.
करोडो भारतीयांना रोज सकाळी उठल्यावर अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे चहा.
तुम्हाला माहित आहे का? कोणत्या राज्यातील लोकं सर्वात जास्त चहा पितात?
चहाचे जास्तीत जास्त उत्पादन असाममध्ये होत असले तरी गोवा, पंजाब आणि काश्मीरमध्ये चहा प्रेमींची संख्या जास्त आहे.
हरियाणादेखील या चहाच्या शर्यतीत अव्वल ठरला आहे. पण पहिलं स्थान मिळवू शकलेला नाही.
सर्वात जास्त चहा प्रेमी असलेलं राज्य 'गुजरात' आहे.
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध असल्याने चहाचा खपदेखील जास्त होत असल्याचे सांगितले जाते.
गुजरातमध्ये वर्षभरात प्रति व्यक्ती 1.4 किलोग्रॅम चहा पितात.