हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?

Published by: Zee Team | Aug 24, 2024

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉ. नेने सोशल मीडियाद्वारे आरोग्यासंबंधित विविध गोष्टी शेअर करता असतात.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

शेंगदाणे तेल : तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाणे तेल फायदेशीर ठरते. या तेलात व्हिटॅमिन ई, माॅनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड असतात.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

शेंगदाणा तेलामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी असतो तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

तिळाचं तेल : तिळाच्या तेलात ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण आढळतात. तिळाचं तेल झिंक, आयरन आणि व्हिटॅमिन ई तसेच मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असतो.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

तिळाच्या तेलात अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रेडिकल्स पासून बचाव करतात.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

मोहरीचे तेल : मोहरी तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. तसेच यात अँटी-बॅक्टीरियल, अँटी फंगल आणि अँटी बायोटिक इत्यादी गुण असतात.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

मोहरीच्या तेलात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडची मात्र कमी असते परंतु फायदेशीर ठरणाऱ्या माॅनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड ऍसिडची मात्रा जास्त असते.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

राइस ब्रान ऑइल : राइस ब्रान ऑयल अँटी ऑक्सीडेंटप्रमाणे काम करते आणि इंफ्लेमेशन दूर करते ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

राइस ब्रान ऑइल वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. तसेच ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

ऑलिव ऑइल : अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी भरपूर असलेल्या ऑलिव ऑयलमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे हृदयाच्या आरोग्याचा धोका कमी होतो.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story