मटणातील कोणता भाग सर्वात पौष्टिक असतो? वाचून आश्चर्य वाटेल

Published by: Zee Team | Jul 22, 2025

लवकरच श्रावण महिना सुरु होणार आहे. तेव्हा अनेकजण जवळपास महिनाभर मांसाहार करत नाहीत.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

त्यामुळे श्रावण सुरु होण्यापूर्वी अनेकजण गटारी साजरी करतात आणि त्यादिवशी आपल्या कुटुंब आणि मित्रांसह मांसाहाराचा आस्वाद घेतात.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

मटण म्हणजे बोकडाचे मांस. हे मांस लोह, प्रथिने आणि इतर जीवनसत्वांनी भरपूर असतं. माहितीनुसार 100 ग्रॅम मटणात 33 ग्रॅम प्रोटीन असतं.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

मटणामध्ये आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 चे प्रमाण खूप चांगलं असतं ज्याच्या सेवनानं शरीरात ऊर्जा आणि शक्ती टिकून खूप काळ राहते.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणेचे डॉ. अनूप गायकवाड यांनी quora.com वर सांगितले, बोकडाचं मटण घेण्यापूर्वी तो बोकड खूप लहान किंवा वृद्ध नसावा. तसेच त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असेल असा बोकड उत्तम असतो.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

मटण जास्त चविष्ट आणि पौष्टिक हवं असेल तर बोकडाचे पुढचे पाय, शोल्डर, छाती, घसा, बरगड्या आणि लिव्हर घेऊ शकता.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

आयआयटी बॉम्बेमध्ये काम केलेल्या अमृता मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार मटण करीसाठी बोकडाची मांडी सर्वोत्तम ठरते तसेच यात लिव्हर टाकल्याने त्याची चव द्विगुणित होते. नोकडच्या मांड्यांमध्ये हाडं आणि मांस चांगले असतं.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

nhs.uk या हेल्थ वेबसाइटनुसार, निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज साधारणपणे 70 ग्रॅमपर्यंत रेड मीट खायला हवं.

Published by: Zee Team | Jul 22, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story