घरात किंवा गॅलरीत लावलेल्या रोपांना इनडोअर प्लांट म्हणतात.
हे आजकालचं ट्रेंड झालं असून लोक आवडीने इनडोअर प्लांटिंग करतात.
इनडोअर प्लांट्सची चांगल्या प्रकारे निगा राखणे खूप महत्त्वाचे आहे.
जाणून घ्या, इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचूक वेळ कोणती
इनडोअर प्लांट्सना पाणी घालण्यासाठी सकाळची वेळ अगदी योग्य आहे.
सकाळी पाणी घातल्याने रोपांना ते शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
सकाळी पाणी घातल्याने ते रोपाच्या मुळांपर्यंत पोहोचण्यासही मदत होते.
संध्याकाळपर्यंत पुरेसं पाणी शोषून घेतल्यानं रोपांना कोणतेही आजार लागत नाहीत.
इनडोअर प्लांट्सना जास्त पाण्याची आवश्यकता नसते.
जास्त पाण्याने रोपातील ऑक्सिजन कमी होते आणि रोपं निर्जीव होतात.