भारतीय जेवणात भाज्यांना खूप जास्त महत्व आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणती ना कोणती भाजी भारतीयांच्या जेवणात असतेच.
भारतात 40 पेक्षा जास्त भाज्यांची शेती केली जाते. पण तुम्हाला माहितीये का? पृथ्वीवर सर्वात आधी कोणती भाजी उगवली जाते.
असं म्हटलं जातं की पृथ्वीवर सर्वात आधी मटार ही भाजी उगवली जाते. ज्याची सुरुवात आशियामध्येच झाली होती.
मानवाद्वारे पृथ्वीवर उगवण्यात आलेली ही पहिली भाजी होती. 7000 वर्षांपूर्वी याचं प्रमाण मिळतं.
मटारचं वैज्ञानिक नाव हे पिसम सॅटिवम हे आहे. याची शेती सर्वात जास्त उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रमध्ये केली जाते.
दावा केला जातो की मटारची लागवड 10000 वर्षांपूर्वी मध्य पूर्वेत केली जात होती. मग 4000 वर्षांपूर्वी संपूर्ण युरोप आणि पूर्व भारतात पसरली होती. याच काळात त्याची उत्पत्ती चीनमध्येही झाली.
मटारमध्येही भरपूर गुणधर्म असतात. त्यात व्हिटॅमिन ए, सी, डी आणि ई आढळते. जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात. वाटाण्यामध्ये काही पोषक घटक देखील आढळतात ज्यामुळे हाडं मजबूत राहतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)