उन्हाळा सुरु होताच अनेक जणांना आंबा खाण्याची इच्छा होते. आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं.
आंबा हा केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
आंब्यामध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन, कॉपर आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की, आंबा कोणत्या व्यक्तीने खाऊ नये.
ज्या व्यक्तीला डायबिटीजचा त्रास आहे अशा लोकांनी आंबा कधीच खाऊ नये. आंब्यामुळे अशा लोकांची साखरेची पातळी वाढू शकते.
ज्या लोकांना गॅस, एसिडिटी आणि कब्जची समस्या आहे. अशा लोकांनी आंबा खाऊ नये.