भारतातील सर्वात श्रीमंत राजा कोण होता?

Pooja Pawar
Apr 08,2025


असं म्हटलं जातं की एकेकाळी भारत इतका श्रीमंत होता की येथून सोन्याचा धूर निघायचा. पण तुम्हाला माहितेय का की भारताच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत राजा कोण होता.


भारतात एक असा राजा होता ज्याच्या खजिन्यात जगाच्या GDP च्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त रक्कम होती. तसेच ज्याचे वार्षिक उत्पन्न ब्रिटनपेक्षा जास्त होते.


भारतातील सर्वात श्रीमंत राजांविषयी बोलायचे झाल्यास मुघल बादशाह अकबर हे या बाबतीत अनेक राज्यांच्या पुढे आहेत.


अकबर बादशाहने त्याच्या शासनकाळात व्यापारावर अधिक लक्ष दिले आणि त्यामुळे त्याच्या काळात मुघल खजाना समृद्ध होता.


मोहम्मद अकबरने त्याच्या शासनकाळात कर व्यवस्थेला मजबूत केले होते. तसेच आपला कारभार वाढवला होता.


अकबराने व्यापारासाठी नवीन मार्ग खुले केले आणि नव्या देशांचा आणि मार्गांचा सुद्धा वापर केला.


अकबरकडे जवळपास 9 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यावेळी ही संपत्ती जगाच्या जीडीपीच्या तुलनेत जवळपास 25 टक्के होती. तेव्हा जगाची जीडीपी जवळपास 36 कोटी रुपये असेल.


जर आजच्या दृष्टीने अकबरने जमा केलेल्या एकूण संपत्तीचा विचार केला तर ती सुमारे 21 ट्रिलियन डॉलर्स एवढी असेल. जी अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या आसपास आहे.

VIEW ALL

Read Next Story