भारतात घराघरात अगदी सर्रास गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. यामध्ये तंतूमय घटक, प्रथिनांचं पुरेसं प्रमाण असल्यानं गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ कायमच शरीरास उत्तम ठरतात. रोटी, चपातीपलिकडे जाऊनही या गव्हाच्या पिठाचा वापर करता येतो. त्यामुळं एकदा हा प्रयोगही करून पाहाच...
गव्हाचं पीठ, दूध, केळं आणि बेकिंग पावडरचं मिश्रण एकजीव करत त्यामध्ये गोडासाठी खजूर किंवा मध, गुळाचा वापर करून पॅनकेक बनवता येतात.
गव्हाच्या पिठात ताक किंवा दही मिसळून काही रोजच्या वापरातील मसाले त्यात वापरून गरम तव्यावर याचे कुरकुरीत डोसेसुद्धा घालता येतात.
साधारण पॅनकेकसारखाच हा एक प्रकार. गव्हाच्या पिठामध्ये दूध आणि अंड मिसळून साधारण जाडसर पण पळीतून सहजपणे पडेल असं पीठ करून नॉनस्टीक तव्यावर हे क्रेप करता येतात.
चपातीसाठी पीठ मळतो तसंच पीठ बनवून त्यापासून नूडल्स करून ते गरम पाण्यात उकळून घ्या आणि लगेचच थंड करा. हे घरगुती नूडल्स खाऊन बाजारातील रेडीमेड पदार्थही विसरून जाल.
पिठामध्ये तूप, गुळ, सुकामेवा मिसळून हे मिश्रण खरपूर भाजून एकजीव करत त्यापासून गव्हाच्या पिठाचा उत्तम शिरा बनवता येतो.
भाज्या, मांस- मच्छी, पनीरचं मिश्रण एकजीव करत गव्हाच्या पिठाच्या पातळ आवरणात हे मिश्रण भरून ते मोमेजसारखे बंद करा आणि वाफवून या सुरेख पदार्थाचाही आनंद घ्या.