वाहतुक कोंडी असताना कशीही वाट काढत जाता येतं. म्हणूनच दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते.
2017 च्या दुचाकी वाहनचालक स्वतःच हेडलाइट चालू किंवा बंद करु शकत होते.
एप्रिल 2017 मध्ये दुचाकी वाहनांबाबत परिवहन मंत्रालयाकडून काही बदल करण्यात आले.
या बदलानुसार बाईक आणि स्कुटी चालवत असताना चालक स्वत:हून हेडलाईट बंद करु शकत नाही.
ड्राईव्ह करताना चालक बाईकचे हेड लाईट हाय बीम किंवा लो बीम असं कमी जास्त करू शकतो.
वाढत्या अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी परिवहन मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
दुचाकी वाहनांची हेडलाईट ही ऑटोमॅटीक मोडवर असल्याने चालकाला समोरील रस्ता स्पष्ट दिसण्यास मदत होते.