'इस्त्री'ला इस्त्री का म्हणतात माहितीये का? कारण फारच रंजक

इस्त्री तुम्ही अनेकदा वापरली असेल

इस्त्री हा शब्द यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकला असेल. तुम्ही इस्त्री अनेकदा वापरलीही असेल. इस्त्रीला इंग्रजीमध्ये आयरन म्हणतात.

सर्वसमान्यांच्या घरातील वस्तू

इस्त्री ही तसा सर्वसमान्यांच्या सर्वांच्याच घरातील वस्तू.

इस्त्री आणि इस्त्रीवाला

घरात इस्त्री नसेल तरी इस्त्रीवाला तरी अनेकांच्या घरून इस्त्रीसाठी कपडे घेऊन जातोच.

इस्त्री केवळ भारतातच म्हणतात

सुरकुत्या घालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या वस्तूला इस्त्री केवळ भारतातच म्हटलं जातं.

'इस्त्री' हे नाव कसं पडलं?

भारतात इस्त्रीला 'इस्त्री' हे नाव कसं पडलं तुम्हाला ठाऊक आहे का?

भारतीय शब्द नाही

सोशल मीडियावर एका चर्चेमध्ये समोर आलेल्या आलेल्या माहितीनुसार इस्त्री हा मूळ शब्द भारतीय नाही.

पोर्तुगीजांनी भारतात आली ही वस्तू

पोर्तुगीज जेव्हा भारतात आले तेव्हा ते कपड्यांवरील सुरकुत्या काढण्यासाठी लोखंडाच्या ठोकळ्यासारखी वस्तू घेऊन आले.

स्पॅनिश भाषेत इस्तिरार

पोर्तुगीज लोक या वस्तूला Esticar इस्तकार म्हणत. हाच शब्द स्पॅनिश भाषेत इस्तिरार बनला.

नवा शब्द जन्माला आला

जेव्हा भारतीयांनी ही वस्तू आपलीशी केली तेव्हा या शब्दाचा अपभ्रंश झाला अन् नवा शब्द जन्माला आला.

भारतीयांनी ठेवलं इस्त्री हे नाव

भारतीय इस्तकार नावाच्या या वस्तूला इस्तरी किंवा इस्त्री म्हणू लागले.

युरोपीयन कपड्यांवरच सुरकुत्या

इंग्रजांचे किंवा युरोपीयन देशातील लोकांच्या कपड्यांवरील सुरकुत्या काढण्यासाठीच इस्त्रीची गरज असते. भारतीयांचा पेहरावच असा होता की कपड्यांवरील सुरकुत्या त्यावर अधिक छान दिसायच्या.

भारतीय कपड्यांमध्ये सुरकुत्या हा लूकचा भाग

पुरुषांचं धोतर असो किंवा महाराष्ट्रात ज्याला लुगडं म्हणतात तशी साडी असो सर्वच पोशाखामध्ये कापडावरील सुरकुत्या या घड्या म्हणून वापरल्या जायच्या.

VIEW ALL

Read Next Story