तुम्ही कधी हॉटेलमध्ये राहायला गेला असाल तर तिथे पाँढरी शुभ्र चादर आणि त्यावर एक कापड पाहीले असेल.
चादरीचं आपण समजू शकतो पण त्या कापडाचा आपल्याला काय उपयोग? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?
या कापडाला काय म्हणतात? त्याचा उपयोग काय? याची माहिती घेऊया.
हॉटेलच्या बेडवर जो कपड्याचा तुकडा (scarf/runner) असतो, त्याला आपण 'बेड स्कार्फ' किंवा 'बेड रनर' म्हणतो.
चादरीवरील हा कापडाचा तुकडा सजावटीसाठी आणि बेडशीटला संरक्षण देण्यासाठी वापरला जातो.
बेड स्कार्फमुळे हॉटेलच्या खोलीला एक खास आणि आकर्षक स्वरूप मिळतं.
हा कपड्याचा तुकडा बॅग किंवा इतर वस्तूंमुळे बेडशीटला होणाऱ्या धूळीपासून वाचवतो.
हॉटेलच्या स्वच्छतेचे प्रतीक म्हणूनही याचा वापर केला जातो.