शुभ कार्या दरम्यान नारळ का फोडला जातो?

Aug 30,2024


हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यातही सुरुवात ही नारळ फोडून केली जाते. नारळ फोडण्याची परंपरा ही अनेक वर्षांपासून चालत आली आहे. पण तुम्हाला यामागचं कारण माहितीये का?


हिंदू धर्मात नारळाला पवित्र मानले जाते. नारळाचा वापर सर्व धार्मिक कार्यक्रम आणि विधींमध्ये केला जातो. नारळाला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.


नारळाचा नैवेद्य देवांना खूप प्रिय आहे, म्हणून देवाला नारळ अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो. नारळ पाणी अत्यंत पवित्र आणि शुद्ध असते.


नारळ पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. नारळपाणी प्यायल्याने अनेक प्रकारचे आजारही दूर होतात. नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हंटले जाते. श्रीफळ हे देवाचे आवडते फळ आहे.


नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि तर आतील पांढरा मऊ भाग हा शांततेचे प्रतीक मानला जातो. म्हणून नारळ फोडणे म्हणजे आपण अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करणे असा याचा अर्थ असतो.


नारळाच्या पृष्ठभागावर तीन खुणा केल्या जातात. या चिन्हांना भगवान शंकराचे तीन डोळे म्हणतात. यामुळे कीर्ती, वैभव आणि समृद्धी मिळते.


गणपतीला नारळाचे फळ खूप आवडते. असे मानले जाते की नारळ फोडल्याने शुभ कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते.


तसेच नारळ हा देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. हे अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव कुटुंबावर राहते अशी श्रद्धा आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story