नेहमी दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी सजग असणाऱ्या कमांडोंना काही नियमांचे पालन करावे लागते.
यापैकीच एक नियम म्हणजे कमांडो कधीही अंडरवेअर घालत नाहीत.
मात्र यामागचं नेमकं कारण काय असेल याविषयी जाणून घेऊयात.
कमांडोंनी अंडरवेअर न घालणे ही गोष्ट अमेरिका आणि वियतनाम युद्धाशी निगडित आहे.
अमेरिकेने जेव्हा वियतनामवर हल्ला केला तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला.
अमेरिकेच्या सैनाची लढाई ही जंगलामध्ये झाली त्यावेळी वातावरण हे फार उष्ण होते.
अतिशय उष्ण वातावरणात अंडरवेअर घातल्याने अमेरिकेच्या सैनिकांना फंगल इन्फेक्शन होऊ लागले.
काही सैनिकांना झालेलं फंगल इन्फेक्शन एवढं जास्त होतं कि यामुळे त्यांची त्वचा अक्षरशः सोलवटली गेली आणि त्यांच्या आरोग्याच्या विविध समस्या होऊ लागल्या.
या घटनेनंतर अमेरिकी सैन्याने एक ऍडव्हायजरी जाहीर केली ज्यात कमांडोंनी पॅन्टच्या आतमध्ये अंडरवेअर घालू नये असं सांगण्यात आलं.