डिओडरेंटमुळे अंडरआर्म काळे का पडतात? तसं होऊ नये म्हणून काय करावं?

Published by: Zee Team | Jun 19, 2025

जर तुमच्या अंडरआर्ममधील त्वचा काळी पडत असेल तर त्याचं कारण डिओडरेंट सुद्धा असू शकतं. तेव्हा या समस्येपासून कसं वाचायचं याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

डिओडरेंटमध्ये असणारं केमिकलमुळे त्वचेला जळजळ आणि एलर्जी होऊ शकते. त्यानंतर अंडरआर्ममध्ये जी सूज येते त्यामुळे तेथील त्वचा काळी पडते.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

ज्या ठिकाणी त्वचेवर एकसारखी जळजळ होते तिथे मेलेनिन बनते. ज्यामुळे तेथील जागा हळूहळू गडद रंगाची होते.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

एल्कोहल, पॅराबेन, फ्रेगरेंस आणि एल्युमिनियम सारखे तत्व त्वचेला जास्त नुकसान पोहोचवतात. तेथील त्वचा ही जास्त संवेदनशील बनते.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

काही डिओडरेंट्समध्ये बेकिंग सोडा किंवा एसेंशियल ऑयल्स असतात. जे संवेदनशील त्वचेला हळूहळू नुकसान पोहोचवतात.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

शेविंग केल्यानंतर तेथील त्वचेवरील पोर्स ओपन होतात. यावेळी डिओडरेंट लावल्यास जास्त जळजळ होते आणि तेथील त्वचा काळी पडते.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

यासाठी हाइपोएलर्जेनिक आणि सुगंध नसलेले डिओडरेंट वापरावा. कॉटनचे कपडे घाला आणि रोज अंडरआर्म्स स्वच्छ करा, यामुळे अंडरआर्म्सची त्वचा काळी होण्यापासून वाचतं.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

काळ्या अंडरआर्म्सवर एलोवेरा जेल, बटाट्याचा रस, हळदीचं दूध इत्यादी लावल्यास हळूहळू अंडरआर्म्सचा काळा रंग निघून जातो. पण याचं नियमित उपयोग करणं गरजेचं आहे.

Published by: Zee Team | Jun 19, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचा वापर करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jun 19, 2025

VIEW ALL

Read Next Story