सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
गेल्या काही वर्षांपासून एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होताना दिसत आहे.
नवविवाहित सून आजच्या काळात सासरी सासू सासऱ्यांपासून वेगळं राहणं पसंत करते.
जेव्हा सून सारसचं घर सोडून जातं तेव्हा त्या विवाहितेलाच दोष दिला जातो. पण यामागे सुनेचा विचार समजून घ्यायला पाहिजे.
प्रत्येक सुनेला सासरच्यांकडून प्रेम आणि आदराची अपेक्षा असते. पण ते न मिळाल्यास तिला त्या घरात असुरक्षित वाटतं.
सासरच्या लोकांनी तिच्यापासून गोष्टी लपवल्यात किंवा खोटे बोलतात. तिला घरातील निर्णयात तिचा सहभाग घेत नाहीत. अशावेळी सासरच घर तिला आपलं वाटत नाही.
तिच्या विचार, तिला काय हवं नको, हे विचारलं जातं नाही. घरातील एक व्यक्ती ना की घरातील महत्त्वाची व्यक्तीचा मान मिळत नाही.
सूनेच्या कपड्यांवरुन आणि इतरांशी होणाऱ्या तुलनेमुळे ती सासरच घर सोडून वेगळी होते.
वैयक्तिक जीवन जगणाचं स्वतंत्र तिला अनेक वेळा सासरी मिळत नाही. म्हणून ती सासरच्या मंडळीसोबत राहत नाही.
घरातील जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतात की, पती पत्नीना एकमेकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा नात्यामध्ये तणाव निर्माण होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)