श्रावण महिना काहीच दिवसांत सुरु होणार आहे. श्रावणी सोमवारला अनेकजण शंकराच्या मंदिरात जातात. (Photos Credits -Meta AI)
महादेवाच्या मंदिरात जाऊन भक्त तेथे आरती, अभिषेक आणि प्रसाद चढवतात. तसेच महादेवाच्या मंदिरात भक्त तीनवेळा टाळी वाजवतात, मात्र त्यामागचं कारण तुम्हाला माहितीये का? (Photos Credits -Meta AI)
शिवमंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवण्याची परंपरा प्राचीन काळापासून पाळली जात आहे. (Photos Credits -Meta AI)
शिवमंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवणे हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आवाहनाशी संबंधित आहे. शिवमंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवून भक्त तिन्ही लोक आणि त्रिदेवाला नमन करतात अशी मान्यता आहे. (Photos Credits -Meta AI)
शिवमंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवून भक्त महादेवाप्रती असलेली त्यांची भक्ती आणि आदर व्यक्त करतात.(Photos Credits -Meta AI)
पहिल्या टाळीचा अर्थ भगवान शिवांना तुमच्या उपस्थितीबद्दल सांगणे. दुसरी टाळी म्हणजे भगवान शिवांना तुमच्या इच्छा व्यक्त करणे आणि तुमच्या प्रार्थना मांडणे. तिसरी टाळी म्हणजे शिवाचा आश्रय घेणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे. (Photos Credits -Meta AI)
धार्मिक श्रद्धेनुसार, पहिली टाळी आपल्या जीवनातील अंधार आणि अज्ञान दूर करते. (Photos Credits -Meta AI)
दुसरी टाळी आपले मन, शरीर आणि आत्मा व्यवस्थित करते आणि तिसरी टाळी भक्त आणि महादेव यांच्यातील खोल संबंध दर्शवते. (Photos Credits -Meta AI)
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) (Photos Credits -Meta AI)