दाढी ठेवणे फक्त फॅशनच नाही तर स्टेटससाठी पण चांगले मानले जाते.
क्लीन शेवनंतर आता दाढी ठेवण्याचा ट्रेंड आलेला आहे.
पण हे ही तितकेच महत्त्वाचे आहे की, दाढी स्वच्छा आणि सुंदर असावी.
एका डेटिंग साइटच्या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, 60% महिलांना दाढी असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात.
लांब दाढी अधिक स्थिरता आणि दीर्घकाळाचे नाते टिकवण्याचे आश्वासन देते.
क्वीसलँड विश्वविद्यालयातील संशोधनात असे म्हटले जाते की, असे पुरुष लग्नासाठी परफेक्ट असतात.
असे म्हटले जाते की, असे पुरुष खूप काळ जास्त चांगली साथ देतात.
संशोधन आणि अभ्यासात असे आढळून आले आहे की, महिलांना दाढी असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात.
पहिला असा समज होता की, महिलांना क्लिन शेव केलेले पुरुष आवडतात. मात्र आता असं नाही.