डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षरावरून अनेक जोक मारले जातात. पण बहुतांश डॉक्टरांचं अक्षर खराब का असतं याविषयी तुम्हाला सांगणार आहोत.
डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षराचं सर्वात मुख्य कारण हे त्यांच्या कामाचे प्रमाण, विशेषतः गर्दीची सरकारी रुग्णालयं जिथे डॉक्टरांना सतत रुग्णांना पहावे लागते. प्रिस्क्रिप्शन लिहावी लागते आणि मेडिकल रेकॉर्ड अपडेट करावे लागतात.
कामाचं प्रेशर जास्त असल्याने डॉक्टरांची अक्षर अनेकदा अस्पष्ट किंवा वाकडी असतात.
परंतू भारतात डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. ओडिशा उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या ढिसाळ हस्ताक्षराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
इतकेच नाही तर 1999 च्या एका अहवालानुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे 44,000 मृत्यू वैद्यकीय चुकांमुळे होतात, त्यापैकी 7,000 मृत्यू हे फक्त डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षरामुळे होतात.
खराब हस्ताक्षराचे आणखी एक उदाहरण स्कॉटलंडमध्ये पाहायला मिळाले, जिथे एका महिलेला अलीकडेच ड्राय आय समजून इरेक्टाइल डिसफंक्शन क्रीम देण्यात आली, ज्यामुळे तिला केमिकल इंजरी झाली.